Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमदेवळा येथील 24 वर्षीय विवाहितेची छेडछाड

देवळा येथील 24 वर्षीय विवाहितेची छेडछाड


आरोपीविरुध्दात विनयभंग,अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

वडवणी (रिपोर्टर):- 24 वर्षीय विवाहित महिला शेतात जात आसताना गांवातीलच इसमाने आडवून तिची छेडछाड करत विनयभंग केल्याची घटना देवळा येथे घडली असून आरोपी विरुध्दात विनयभंग सह अट्रॉसिटी आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वडवणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वडवणी तालुक्यातील मौजे देवळा येथील 24 वर्षीय विवाहित महिला शेतात पायी जात आसताना गावातीलच पोपट धोंडीराम डोंगरे या इसमाने महिलेला रस्त्यात गाडी आडवी लावत तूझा मोबाईल नंबर दे,मला तुझ्याशी बोलायचे आहे.असे म्हणताच त्या इसमाला नकार देत माझे पती पुढे गेले आहेत.मला जायचे आहे असे सांगितले तेव्हा महिलेच्या कानावर पोपट डोंगरे यांने चापट मारत विवाहितेच्या हाताला धरुन शेजार असणाऱ्या उसाच्या शेतात ओढले आणि अंगाशी नैसर्गिक कृत्य करत आसताना महिला ओरडली तेव्हा महिलेच्या पतीने घटनास्थळी धाव घेतली असता पोपट डोंगरे यांने तेथून पळ काढत विवाहितेला व तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली.हि घटना दि.1 आँगस्ट रोजी दुपारी घडली आहे.यांची सर्व हाकिकत विवाहितेने सासु व दिराला सांगितल्यानंतर काल पिडित विवाहितेच्या फिर्यादीवरुन आरोपी पोपट धोंडीराम डोंगरे यांच्या विरुध्दात वडवणी पोलीस स्टेशनला विनयभंग सह अँट्रासिटी आणि जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा आधिक तपास माजलगांवचे डिवायएसपी करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!