चोरटे जेरबंद, मुद्देमाल जप्त
पेठ बीड हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली होती चोरी
बीड (रिपोर्टर) तेलगाव नाका येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चोरीची घटना घडली होती. यामध्ये चोरट्याने दवाखान्यातील साहित्य चोरून नेले होते. जवळपास 3 लाखांपेक्षा जास्तीचे साहित्य चोरीला गेले होते. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्याचा छळा पोलीसांनी लावला असून चोरट्याला जेरबंद करून 3 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तेलगाव नाका येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे कुलूप तोडून आतील विविध साहित्य चोरून नेण्यात आले होते. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी आकाश खोगरे यांनी 24-4-2023 रोजी पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्याचा छळा पोलीसांनी लावला. गोपनीय माहितीनुसार शेख अख्तर शेख रशीद (वय 30, रा. गांधीनगर पेठ बीड) हा या प्रकरणात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदरील गुन्हेगार चोरीच्या वस्तू विक्री करण्याच्या तयारीत असल्याचे खबर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्या सोबत चोरी करण्यासाठी शेख साहील हाही असल्याचे निष्पन्न झाले. या दोघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडील 3 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमा ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी रामचंद्र पवार, बब्रुवान गांधले, सहायक फौजदार मुंजाबा सौंदरमल, पो.हे.कॉ. सुभाष मोटे, बळीराम कातखडे, अजित शिकेतोड, विष्णू गुजर, औदुंबर गिरी, बिभिशन सांगळे, रमाकांत कोठावळे, गणपत पवार यांनी केली. तपासादरम्यान आरोपीकडून 30 हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात अन्य एक गुन्हा उघडकीस आला आहे.