बीड (रिपोर्टर) एमबीबीएसच्या प्रथम वर्षात चार वेळेस अपयश आल्याने एका 23 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आईच्या विश्वासाला मी पात्र ठरलो नाही, असा उल्लेख करण्यात आला आहे.
आकाश संतोष जोगदंड (रा. देवीबाभुळगाव ता. जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सोलापूर येथील डॉ. वैशंपायन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता. प्रथम वर्षात सलग चार वेळेस त्याला अपयश आले. त्यामुळे तो नैराश्येत होता. गेल्या काही दिवसांपूर्वी तो गावी आला होता. त्यानंतर पुन्हा तो शिक्षणासाठी सोलापूरला गेला मात्र कॉलेजच्या हॉस्टेलला न जाता तो एका हॉटेलमध्ये थांबला आणि त्याच हॉटेलमध्ये गळफास घेून त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यामध्ये लिहिले आहे की, आईच्या विश्वासाला पात्र ठरलो नाही, आई काळजी घे, बहिणीचा निट सांभाळ कर, माझ्या मृत्यूची वार्ता अगोदर माझे मामा व मित्रांना द्या, कारण आई व बहिणीला धक्का बसेल, माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहले आहे.