Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमकर्मचार्‍याची ऑनलाईन फसवणूक १ लाख ३८ हजाराला घातला गंडा

कर्मचार्‍याची ऑनलाईन फसवणूक १ लाख ३८ हजाराला घातला गंडा


धारूर (रिपोर्टर):- क्रेड फायनान्समधून बोलतोय, असे म्हणत एका भामट्याने कर्मचार्‍यास फोन करून त्याचा मोबाईल क्रमांक घेत खात्यातील एक लाख ३८ हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. काही भामटे बँकेतून बोलतोय, असे म्हणत सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक तर करतच आहे त्याचबरोबर शासकीय कर्मचारीही यामध्ये फसत असल्याचे दिसून येत आहे. धारूर शहरातील लक्ष्मीनगर भागात राहणारे दत्ता ताराचंद आडाणे हे व्यक्ती नोकरदार असून सीआरडी ऍपचा वापर करताना एसबीआय क्रेडीट कार्ड जमा केलेले पेमेंट जमा न होता पेंडिंग राहिले होते. याचाच फायदा घेत अनोळखी व्यक्तीने सीआरडी कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून ८७५६११६१८१ या मोबाईल क्रमांकावरून दोन वेळा फिर्यादीस फोन केला. आडाणे यांना एसबीआय क्रेडीट कार्डचे जमा केलेले पेमेंट जमा करतो म्हणून वापरत असलेल्या ऍपचा ओटीपी व गुगल कोड हस्तगत केला. आरोपीने त्या आधारावर आडाणे यांचा मोबाईल हॅक करत त्यांचा गुगल ड्राईव्ह आणि जीमेलचा डाटा चोरून घेत क्रेड ऍप्लीकेशनमधून ९० हजार रुपयांचे कर्ज घेतले तसेच क्रेडीट कार्डावरील ४८ हजार ७४४ रुपये स्वत:च्या खात्यात जमा केले. आडाणे यांची एकूण १ लाख ३८ हजार ७४४ रुपयांची फसवणूक करत संपुर्ण माहिती चोरली. या प्रकरणी धारूर पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!