Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडआधी शेत करपलं, नंतर पावसाने झोडपलं, आज पालकमंत्र्यांनी सावरलं, जिल्ह्याच्या टोकाच्या गावापासून...

आधी शेत करपलं, नंतर पावसाने झोडपलं, आज पालकमंत्र्यांनी सावरलं, जिल्ह्याच्या टोकाच्या गावापासून ना. धनंजय मुंडे शेतकर्‍यांच्या बांधांवर


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असुन आष्टी तालुक्यातील काही महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे हे आज सकाळपासून बीड जिल्ह्यात पाहणी दौरा करत आहेत. आष्टी तालुक्यातील मराठवाडी या जिल्ह्याच्या टोकाच्या गावापासून दौर्‍याला सुरुवात झाली असून, नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास ना.मुंडेंनी मराठवाडी गावकर्‍यांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे. आधी पावसाअभावी शेतातले पीक करपुन गेले, उरले सुरले आले ते पावसाने नेस्तनाबुद केले. आज मात्र पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याच्या टोकाच्या गावापासून शेता शेतात चिखल तुडवत जावून पीक परिस्थितीची पाहणी केली. शेतकर्‍यांना आधार देत सावरल्याने शेतकर्‍यांचे मनोबल वाढले.

241168999 357404602596730 5841939500276801382 n


आष्टी तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या मराठवाडी, शेडाळा, देऊळगावघाट, सावरगांव, गंगादेवी या गावाचा पाहणी करताना शेतातून पिके वाहुन गेलेल्या बाजरी, सोयाबीन आदी पिकांची शेतांवर जाऊन पाहणी केली. यावेळी आ. बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी रमेश मुडलोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री जेजुरकर, माजी आ. साहेबराव दरेकर,तहसीलदार राजाभाऊ कदम, डॉ.शिवाजी राऊत, सतिश शिंदे, अण्णासाहेब चौधरी, शिवाजी डोके, महादेव डोके, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, शिवाजी नाकाडे, रामभाऊ खाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री धंनजय मुंडे शेतकर्‍यांशी संवाद साधताना म्हणाले की, आता नुकसानीचे पुर्वी प्रमाणे पंचनामे न करता महसुल, कृषी व विमा कंपनीचे असे तिनही अधिकारी यांनी संयुक्त पणे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करतील. त्यानुसार जास्तीत जास्त भरपाई महाविकास आघाडी सरकार कडुन मिळवुन देण्यासाठी मी व माझे सहकारी प्रयत्नशिल असल्याचे मुंडे यांनी सांगितले. यावेळी गंगादेवी येथील तुटलेला रस्ता, सावरगाव येथील छोट्या नदीच्या पुरामुळे झालेले नुकसान यांची देखील पाहणी करून ना.मुंडे यांनी गंगादेवी येथील गावकर्‍यांच्या मागणीनुसार रस्त्याच्या पुनर्बांधणी कामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!