Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeसंपादकीयभयानक क्रुरता

भयानक क्रुरता


माणुस माणुसकी विसरुन हैवानासारखा वागतो. कधी,कधी हैवान इतका अन्याय, अत्याचार करत नाहीत, तितका माणुस करू लागला. माणसामध्ये पुर्वीपासूनच कु्रुरता आहे. जेव्हा माणुस जन्माला येतोे. तेव्हा तो अगदी विचारहिन असतो. माणुस जस,जसा वाढत जातो. तसा त्यात बदल होत असतात. काही माणसं चांगल्या लोकांच्या संगतीत असतात. त्यामुळे त्यांचे विचार चांगले होतात. काहींची संगत गुण वाईट असते. त्यामुळे त्यांच्या विचारात चांगलेपणा नसतो. माणुस घडवण्यासाठी अनेक अग्निदिव्यातून जावे लागते. समाजात माणसाला माणूसपण आणण्यासाठी अनेक उपाय योजना आखल्या जात असतात. वैचारीक मंथनातून माणुस घडत असतो. काही माणसं घडत नाहीत, वायाला जातात. माणसातील हैवानीपणा अनेकांचे आयुष्य उध्दव करु शकते. एक चुक किती महाग पडू शकते हे गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्हेगाराला कळत असतं. गुन्हे अनेक प्रकारचे आहेत. काही गुन्हे सौम्य असतात. काही गंभीर असतात. खून करणं, बलात्कार करणं, जबर मारहाण करण हे गंभीर गुह्यात मोडतं. भारतीय कायद्यात गुन्हेगाराला विविध प्रकारची शिक्षा सुनावली जाते. गंभीर गुन्हा असेल तर फाशी किंवा जन्मठेप अशी शिक्षा सुनावण्यात येते. गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतरही गुन्हयात कमी होत नाही. रोज काही ना काही गुन्हे घडत असतात. पोलिस ठाण्यात असा एक दिवस रिकामा जात नाही. त्या दिवसी गुन्हा घडत नाही. महिला, मुलीवर पुर्वीपासून अन्याय, अत्याचार होत आले. पुर्वी तर महिलांना घराचा उंबरा ओलांडण्याची परवानगी नव्हती. समाजसुधारकांनी महिलांच्या आयुष्यात प्रकाश आणला. त्यांना त्यांचे हक्क, अधिकार मिळवून दिले. प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे असली तरी महिलांकडे पाहण्याचा वाईट दुष्टीकोन बदलला नाही. पुरुषी अहंकार, नराधमी वृत्ती दिवसे,दिवस वाढतच आहे. महिला, मुलीवर अत्याचार होत आहेत. देशात अत्याचाराच्या रोज अनेक घटना घडतात. काही घटना इतक्या भयानक असतात की, माणुसकीला काळीमा फासतात. रात्रीच्या, दरम्यान, महिलांनी प्रवास करावे की नाही असंच झालं. काही शहरात महिलांना रात्री त्रास सहन करावा लागतो. एकटी महिला दिसली की, तिच्यावर अत्याचार होतात. अत्याचार करुन तिला संपवलं जातं असं आज पर्यंत अनेक ठिकाणी घडलेलं आहे. पुण्याची एक घटना राज्याला हादरुन टाकणारी आहेत. 14 वर्षीय एक मुलगी पुण्याच्या रेल्वेस्टेशनवर आली होती. या मुलीला बिहारला जायचं होतं. रात्रीच्या दरम्यान, गाडी नसल्यामुळे ती रेल्वेस्टेशवर थांबली होती. या स्टेशनवर काही मवाली आले. मदत करण्याच्या बहाण्याने सदरील मुलीस एका लॉजवर नेवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. दुर्देवं. दु:खद बाब म्हणजे या मुलीवर सामुहिक अत्याचार झाले ते ही दोन दिवस, हा प्रकार उजाडात आल्यानंतर पोलिस प्रशासन हाललं या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली. बलात्कार होवून ही मुलीस बिहारला काहींना सोडलं. हा ही गंभीर प्रकार आहे. मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिला पोलिसांच्या स्वाधीन करायला हवे, पण असे न करता. काहींनी प्रकरण दडपण्यासाठी बिहारला सोडले. पोलिसांनी एकूण 14 आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला. एक चौदा वर्षाची अल्पवयीन मुलगी रेल्वे स्टेशनवर एकटी असते आणि तिला मदत करण्याऐवजी तिच्यावर अत्याचार होतो. अत्याचार करण्यापुर्वी नराधम कसला ही विचार करत नाहीत. हीच मुलगी या नराधमाच्या घरातील कुणी असती तर? माणुसकी नावाची जी गोष्ट असते. ती आज शिल्लक राहिली नसल्याचे दिसून येते. मुख्य आरोपी हे रिक्षा चालवणारे आहेत, म्हणजे सर्व छोटे व्यवसायीक आहेत. व्यवसायीकांनी थोडी, लाज लज्जा बळगायली हवी. आपला व्यवसाय रिक्षा चालवण्याचा आहे. कुणी अडचणीत असेल तर त्याला मदत करणं हा माणुसकीचा धर्म आहे. असं न करता. मुलगी आहे म्हणुन तिच्यावर अत्याचार करुन या नराधमांनी आपल्यातील हैवानीवृत्ती दाखवून दिली. गंभीर प्रकरणात प्रशासनाने ठोस भुमिका घेतली पाहिजे. बलात्कार प्रकरणात सरकार अगदी दक्ष असलं पाहिजे. बलात्कार प्रकारणात तात्काळ शिक्षा व्हायला हवी. अनेक प्रकरणाचे लवकर निकाल लागत नाही. कित्येक वर्ष कोर्टात तारखा चालत असतात. सध्या देशभरातील न्यायलयात बलात्कार प्रकरणाच्या हजारो केसेस प्रलंबीत असतील. गंभीर गुन्हा घडल्यानंतर हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी. नराधमीवृत्ती ही समाजासाठी धोकादायक असते. त्यासाठी प्रत्येक नागरीकांनी विशेष करुन महिला, मुलींनी दक्ष राहायला हवं.

Most Popular

error: Content is protected !!