Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमरंगलेल्या गालाच्या मुक्याचा प्रवीण दरेकरांना फटका सिंहगड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल

रंगलेल्या गालाच्या मुक्याचा प्रवीण दरेकरांना फटका सिंहगड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल


पुणे (रिपोर्टर)- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष असल्याचे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले होते. ते वक्तव्य दरेकरांच्या अंगलट येण्याचे चिन्हे असून या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागा, म्हणणार्‍या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज दरेकर यांच्या विरोधात पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. चाकणकर या माफीच्या भूमिकेवर ठाम आहेत.

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी प्रवेश निश्‍चीत केल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी पुण्यात बोलताना असभ्य टीका केली होती. राष्ट्रवादीवर टीका करताना प्रवीण दरेकर घसरले आणि त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा रंगेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष असल्याची टीका केली होती. या टीकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या वक्तव्यातून प्रवीण दरेकर यांचा आणि अभ्यासाचा दुरान्वये संबंध दिसून येत नाही. आपण जे शब्द वापरले, जे वाक्य उच्चारले ते बोलण्यासही लाज वाटते. दरेकरांच्या बोलण्यात वैचारिक दारिद्य्र दिसून येते. त्यांच्या बोलण्यामुळे त्यांच्या पक्षाची संस्कृती दिसून आली आहे. चाकणकर पुढे असेही म्हणाल्या, आपल्या पक्षातील काही महिला अशा आहेत ज्या महिलांच्या कैवारी असल्याचे आव आणतात. आज त्यांची मला किव वाटते. त्या अशा पक्षात काम करतात जिथे हा विचार आहे. त्यामुळे पक्षाची संस्कृती दिसून येते. केलेल्या वक्तव्याबद्दल महिलांची माफी मागा, अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस महिलांचा अपमान करणार्‍यांचे गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकते. दरेकरांनी माफी मागावी या भूमिेकवर ठाम असलेल्या रुपाली चाकणकर यांनी आज पुण्याच्या सिंहगड पोलीस ठाण्यात दरेकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरनंतर पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Most Popular

error: Content is protected !!