Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeकोरोनामहाराष्ट्रातली करोना रुग्णांची संख्या टेन्शन वाढवणारी,आज राज्यात ६ हजार १५९ नवे...

महाराष्ट्रातली करोना रुग्णांची संख्या टेन्शन वाढवणारी,आज राज्यात ६ हजार १५९ नवे करोना रुग्ण

ऑनलाईन रिपोर्टर
महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्रातल्या सीमांवर तपासणी करण्यात येते आहे. दिल्ली, गुजरात, गोवा आणि राजस्थान या चार राज्यातून येणाऱ्यांचीही चाचणी होते आहे. अशात करोना रुग्णांची आजची संख्या टेन्शन वाढवणारी आहे. आज राज्यात ६ हजार १५९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १७ लाख ९५ हजार ९५९ इतकी झाली आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये ६५ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये ४ हजार ८४४ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण १६ लाख ६३ हजार ७२३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.६४ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४ लाख ५६ हजार ९६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ९५ हजार ९५९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ५ लाख २९ हजार ३४४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ६ हजार ९८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८४ हजार ४६४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात ६ हजार १५९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधितांची एकूण संख्या १७ लाख ९५ हजार ९५९ इतकी झाली आहे. आज नोंदवण्यात आलेल्या ६५ मृत्यूंपैकी ५६ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर ९ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!