Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeदेश विदेशविमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचं इंधन महाग

विमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचं इंधन महाग


मुंबई (रिपोर्टर)- रविवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आल्यानंतर सोमवारी इंधनाचे दर तेल कंपन्यांनी स्थिर ठेवले आहेत. मात्र असं असलं तरी दिल्ली, मुंबईसहीत अनेक शहरांमध्ये इंधनाच्या दरांनी नवीन उच्चांक गाठले आहेत. स्वयंचलित पेट्रोल-डिझेल हे हवाई इंधनापेक्षा 30 टक्क्यांनी महाग झाले आहे.पेट्रोल-डिझेलच्या दरांत रविवारी सलग चौथ्या दिवशी लिटरमागे 35 पैशांची वाढ झाल्यामुळे देशभरात हे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.
मुंबईत दर किती?

मुंबईत प्रति लिटर पेट्रोलसाठी 111.77 रुपये मोजावे लागत असून, दिल्लीतही हे दर आजवरचे सर्वाधिक, म्हणजे 105.84 रुपये इतके झाले आहेत. मुंबईत डिझेलचे दर प्रति लिटर 102.52 रुपये असून, दिल्लीत 94.57 रुपये आहेत. हवाई इंधन (एव्हिएशन टर्बाईन फ्युएल- एटीएफ) ज्या दरांत विमान वाहतूक कंपन्यांना विकले जाते, त्यापेक्षा दुचाकी आणि मोटारींमध्ये वापरल्या जाणार्‍या पेट्रोलचे दर आता 33 टक्क्यांनी अधिक आहेत. दिल्लीत ‘एटीएफ’चे दर एका लिटरला 79 रुपये इतके आहेत. देशभरातील सर्वात महाग इंधन राजस्थानमधील गंगानगर या सीमेवरील शहरात मिळत असून, तेथे पेट्रोलचे दर लिटरला 117.86 रुपये, तर डिझेलचे दर 105.95 रुपये आहेत.

Most Popular

error: Content is protected !!