Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडएमआयएमचा नगरपालिकेवर मोर्चा

एमआयएमचा नगरपालिकेवर मोर्चा


बीड (रिपोर्टर)- शहरातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत केला जात नाही. पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी आज एमआयएमच्या वतीने बीड नगर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये अनेकांची उपस्थिती होती.

बिंदुसरा आणि माजलगाव धरणामध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा असताना बीड नगरपालिका आठ ते दहा दिवसआड पाणीपुरवठा करत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवाव्यात, यासह इतर मागण्यांसाठी आज एमआयएमच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या वेळी न.प. कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Most Popular

error: Content is protected !!