Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडजिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन भूमाफियावर कारवाई कधी होणार?

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन भूमाफियावर कारवाई कधी होणार?

बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यातील देवस्थानाच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न झालेला आहे. या प्रकरणात दोषी विरोधात अद्यापही कारवाई झालेली नाही. कारवाईसाठी भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये अनेकांचा सहभाग होता.

बीड तालुक्यातील मौजे नामलगाव येथील आशापुरक देवस्थान, पालवण येथील श्रीरामचंद्र देवस्थान, बेलखंडी येथील गोसावी मठ, खडकीघाट येथील रामचंद्र देवस्थान तसेच धारूर येथील बालाजी मंदिर, अंबाजोगाई शहरातील थोरले दत्तात्रय देवस्थान, आष्टी तालुक्यातील विठोबा देवस्थान, पांढरी व मुर्शदपुर येथील विठोबा देवस्थान, कोयाळा येथील रामचंद्र देवस्थान, बेलगाव येथील खंडोबा देवस्थान, चिखली येथील रामचंद्र देवस्थान, चिंचपूर येथील श्रीरामचंद्र देवस्थान, दादेगाव येथील श्रीराम देवस्थान यांची ईनामी जमीन तत्कालीन उपजिल्हाधिकारी शेळके, आघाव पाटील तसेच संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी यांनी आर्थिक हितसंबंध जोपासत भूमाफियांशी संगनमत करून कवडीमोल दराने हस्तांतरीत केली. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे. या मागणीसाठी गणेश ढवळे, संदिप जाधव, शेख युनुस, युसुफ यांच्यासह आदींचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!