सोलापूर (रिपोर्टर)- आपल्यावर खूप अन्याय झालाय, अन्यायाची जाणीव राहू द्या, आरक्षणासाठी आपल्या मराठा बांधवानी बलिदान दिले, हे बलिदान विसरता येणार नाही. मराठा बांधवांच्या बायकांच्या कपाळावरचे कुंकू पुसलं, याची आपल्याला आठवण ठेवायला लागणार आहे. त्यामुळे हा पहिला आणि शेवटचा लढा समजून एवढ्या ताकदीनं उभं राहा की आरक्षण पदरात पडलंच पाहिजे, असं कळकळीच आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
मनोज जरांगे पाटील हे आज सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या दौर्यावर असून आज या ठिकाणी मराठा बांधवांची भव्य सभा होत होत आहे. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवाना सूचक सल्ला दिला. यावेळी ते म्हणाले, आपल्या समाजासाठी अनेकांनी बलिदान दिले, हे बलिदान विसरता येणार नाही. अण्णासाहेब पाटलांपासून, अण्णासाहेब जावळे पाटलांपर्यंत, वडजे पाटलांपासून, विनायक मेटे साहेबांपर्यंत बलिदान दिले असून काकासाहेब
शिंदेपासून आत्तापर्यंत 55 पेक्षा जास्त बांधवांनी बलिदान दिले आहे, ते आपल्याला विसरून चालणार नाही. आपल्यासाठी त्यांच्या बायकोच्या कपाळावरच कुंकू पुसलं याची आठवण आपल्याला ठेवायला लागणार आहे. एवढा मोठा समाज असताना त्यांच्यावर मायचं छत्र आपल्याला धराव लागणार आहे. आता पुढच्या काळात अन्याय होऊ द्यायचा नाही, हा लढा शेवटचा आणि पहिला समजून इतक्या ताकदीने लढायचा की मराठ्यांच्या पदरात आरक्षण पडलंच पाहिजे आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही: मनोज जरांगे मनोज जरांगे पुढे म्हणाले की, आपल्या जातीवर अन्याय होतो आहे, म्हणून आपण एकजुट झालो. त्यामुळे असच आपण एकजुटीने सोबत राहील पाहिजे.
आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही. आपली मुलं नोकरी, उच्च शिक्षणापासून वंचित राहीले नाही पाहिजे. शांततेत आरक्षणाचा लढा सुरु झाला. आजपर्यंत सुरु आहे. मात्र सगळ्याला पोसले तेच आज आपल्याला डाग लावतात, आता त्यांचाच नंबर आहे. आरक्षणाच्या विरोधात बोलला तर सु्ट्टीच नाही. 55 पेक्षा जास्त मराठा बांधवांनी बलिदान दिल आहे. त्यांची मुलं उन्हात पडली आहेत, त्यांच्यावर मायेचं छत्र ठेवावं लागणार आहे. हा पहिला आणि शेवटचा लढा समजून आरक्षण मिळालच पाहिजे, इतक्या ताकदीने लढा लढायचा आहे. म्हणुन आरक्षणासाठी मराठा समाजाला मागास सिद्ध असणं गरजेचं आहे. गायकवाड समितीने 12- 13 टक्के आरक्षण दिल जाऊ शकत, असं म्हटलं आहे. आणि एका दिवसांत कायदा करता येऊ शकतो. विदर्भात कुणबी प्रमाणपत्र मिळतय, म्हणून आपल्यालाही ते हवं आहे, असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.