परळी (रिपोर्टर)- लातुर परभणी शिवशाही बसचा टायर फुटल्याने गाडीने घेतला पेट. परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व डुबे पेट्रोल पंपानजीक ही घटना शुक्रवारी (ता. 20) रात्री 9:30 च्या सुमारास घडली. बसमधील वाहक, चालक व आतील सहा प्रवासी सुखरूप बाहेर पडल्याने अनर्थ टळला आहे. लातुर परभणी शिवशाही बस परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ओलांडून डुबे पेट्रोल पंपानजीक येताच टायर फुटला. फुटलेल्या टायरने पेट घेतला. चालकाने गाडी थांबवली व स्वतः बाहेर पडले. वाहकासह सहा प्रवाशी बसमधुन सुखरुप बाहेर पडले. बसच्या टायरने पेट घेतला. आगीच्या भक्ष्यस्थानी बस आल्याने व पेट्रोल पंप जवळच असल्याने तेथे उपस्थित असलेल्या नागरीकांनी भीतीपोटी पळ काढला. बस अवघ्या दहा मिनिटात आगीच्या भक्ष्यस्थानी आली. अग्निशमन गाडी येईपर्यंत बस ने पुर्ण पेट घेतला होता. परळी नगर परिषदेच्या अग्निशमन दलानी आग आटोक्यात आणली. यावेळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गर्दी पांगविण्यासाठी पोलीसांना कसरत करावी लागली. मुखीम शमीम अन्सारी (रा. परभणी) यांनी याच बसमधुन लातुर येथुन परळी पर्यंत चा प्रवास केला. त्यांनी सांगितले की लातुर परभणी बसमध्ये अंबाजोगाई बसस्थानका नजीक बिघाड झाला. त्यामुळे दुसर्या शिवशाही बसची सोय एसटी महामंडळाने केली. परंतु याही बसच्या टायरचा आवाज सुरुवाती पासून येत होता. अखेर परळी शहरात आल्यावर जे व्हाईच तेच झाल. प्रवासी मी असल्याने आम्ही बसमधुन सुखरुप बाहेर पडु शकलो असे मुखीम शमीम अन्सारी यांनी सांगितले.