• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सुप्रीम कोर्ट प्रत्येक वेळी कानफाट फोडतंय; राहुल नार्वेकरांना सुनावत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल!

by Beed Reporter
October 25, 2023
Reading Time: 1 min read
0
सुप्रीम कोर्ट प्रत्येक वेळी कानफाट फोडतंय; राहुल नार्वेकरांना सुनावत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल!
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


मुंबई (रिपोर्टर): सर्वोच्च न्यायालयाकडून वारंवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून सुनावलं जात असताना उद्धव ठाकरेंनी आज दसरा मेळाव्यानिमित्त केलेल्या भाषणात त्या मुद्द्याचा उल्लेख केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकरांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच, देशात सर्वोच्च न्यायालय, अस्तित्वात राहणार आहे का? लोकशाही अस्तित्वात राहणार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी एक विनोदही सांगितला.
जवळपास एक वर्ष होऊन गेलं. आपण सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेचा मुद्दा घेऊन गेलो आहोत. तारखेवर तारीख. काय करायचं तेच कळत नाही. सर्वोच्च न्यायालय लवादाचं कानफाट प्रत्येक वेळी फोडलंय. पण निर्लज्जम सदासुखी. कानफाट फोडलं तरी गाल चोळत सांगतात आम्ही आमचं वेळापत्रक सादर करू. ठीक आहे तुम्ही तुमचं वेळापत्रक द्यायचं तेव्हा द्या. हे सगळं बघितल्यावर एक विनोद मला आठवतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एक विनोद ऐकवताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
उद्धव ठाकरेंनी सांगितला विनोद!
एकदा भरल्या कोर्टात न्यायमूर्ती एका 20 वर्षांच्या मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणाची सुनावणी घेत असतात. आरोपीच्या पिंजर्‍यात एक आजोबा काठी टेकत येतात. न्यायाधीशांचं डोकं फिरतं. ते म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही? आजोबा असूनही तुम्ही 20 वर्षांच्या मुलीची छेड काढता? आजोबा म्हणतात, न्यायाधीश महाराज, ही घटना घडली, तेव्हा मीही 20 वर्षांचाच होतो. इतकी वर्षं झाली, तरी केस चालूच आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.
माझं स्पष्ट म्हणणं आहे. ठीक आहे, तुम्ही अपात्रतेचा निर्णय जेव्हा लावायचा तो लावा. 20 वर्षांनी, 50 वर्षांनी लावा. पण आज संपूर्ण देश, संपूर्ण जग फक्त अपात्रतेच्या निर्णयाकडे बघत नाही. भारतात सर्वोच्च न्यायालयाला हा लवाद जुमानत नसेल, तर सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व राहणार आहे की नाही? या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेचं अस्तित्व राहणार आहे की नाही? भारतमातेची लोकशाही टिकणार की नाही याकडे आमचं लक्ष आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. अपात्र कुणाला ठरवणार? जनतेनं कोण अपात्र आहे हे ठरवून टाकलं आहे. माझं तर म्हणणं आहे की केसचा निकाल लागण्याआधी निवडणुका घेऊन दाखवा. जनता ठरवेल की ते पात्र आहेत की अपात्र आहेत. होऊन जाऊ द्या. पण सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला अपेक्षा आहेत, असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

Previous Post

भर दसर्‍याच्या दिवशी गेवराईच्या भूमिअभिलेख कार्यालयातसापडला कुणबी नोंदीच्या सोन्याचा खजिना

Next Post

पैशाचे राजकारण करणार्‍यांचा पाडाव; पंकजा मुंडे यांचा निर्धार

संबंधित बातम्या

बीड

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

by गणेश सावंत
March 12, 2026
बीड

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

by गणेश सावंत
March 6, 2026
बीड

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

by गणेश सावंत
March 4, 2026
क्राईम

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

by गणेश सावंत
March 3, 2026
क्राईम

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

by गणेश सावंत
March 3, 2026
Next Post
पैशाचे राजकारण करणार्‍यांचा पाडाव; पंकजा मुंडे यांचा निर्धार

पैशाचे राजकारण करणार्‍यांचा पाडाव; पंकजा मुंडे यांचा निर्धार

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?