बीड (रिपोर्टर)- मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आमरण उपोषण करतअसून त्यांना समर्थन देण्यासाठी गाव पातळीसह तालुका आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. आज वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी आंदोलन केले. या वेळी अनेक वकिलांचा सहभाग होता. तसेच मांजरसुंबासह इतर ठिकाणीही साखळी आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी राज्यभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करण्यात येत आहे. या आंदोलनांना ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असून जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू आहे. दररोज अनेक गाव साखळी उपोषणामध्ये सहभागी होत आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वकिलांनी साखळी उपोषण केलेआहे. या उपोषणामध्ये अनेक वकिलांचा सहभाग होता तर मांजरसुंबा येथेही ग्रा.पं. कार्यालयासमोर साखळी आंदोलन करण्यात आले आहे. तर लिंबागणेश जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत लिंबागणेश, मुळुकवाडी, मसेवाडी, सोमनाथवाडी, बेलगाव, पोखरी घाट, पिंपरनई, मोरगाव, पाटोदा, बेलखंडी, नागझरी, करचुंडी येथे गावकर्यांनी आंदोलन केले.
जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ नित्रूड येथे नऊ गावच्या लोकांचे साखळी उपोषण
बीड (रिपोर्टर)- मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, व आरक्षणाचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा या मागणीसाठी आजपासून माजलगाव तालुक्यातील नित्रूड या ठिकाणी परिसरातील नऊ गावच्या गावकर्यांनी साखळी उपोषण सुरू केले अहो. उपोषणाला बसण्याआधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार चालढकलपणा करत आहे. या मागणीसाठी पुन्हा दुसर्यांदा अंतरवली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून नित्रूड पंचायत समिती विभागाच्या वतीने परिसरातील नऊ गावच्या लोकांनी उपोषण सुरू केले आहे. यामध्ये टालेवाडी, टकारवाडी, नित्रूड, बाभळगाव, राजेवाडी, लामेवाडी, नाकलगाव, पिंपळगाव, येथील गावकर्यांचा समावेश आहे. हे उपोषण साखळी पद्धतीने करण्यात येणार आहे. उपोषणामध्ये प्रामुख्याने प्रतिक डाके, दीपक महागोविंद, विकास डाके, आनंत नाईकवाडे, गोपाळ कुलकर्णी, कामराज बोरचाटे, अॅड. अशोक डाके, अंगद बोरचाटे, दत्ता डाके, दिनकर डाके, अभिनव लाटे, इंद्रजीत लाटे, भय्यासाहेब लाटे, सुंदर राऊत, सुखदेव घुले, बालासाहेब तेलगड, दत्ता घुले, शिवाजी लोंढे, संतोष घुले, हनुमंत कोथिंबीर, बाबासाहेब पवार, माऊली सुरवसे, विलास डाके, आदींचा उपोषणामध्ये सहभाग आहे.