बीड (रिपोर्टर):- एका 17 वर्षीय तरुणाचा बीड शहरालगत असलेल्या शिवदर्यातील तलावात मृत्तदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा तरुण 25 तारखेपासून बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. तलावाजवळ त्याचे कपडे अन् महाविद्यालयातील आयकार्ड आढळून आल्याने तो पोहण्यासाठी गेला असावा असा आंदाज व्यक्त केला जात आहे.
या बाबद अधिक माहिती अशी की, राम परमेश्वर इंगळे (वय 17 वर्षे, रा. पंचशीलनगर बीड) हा युवक बीड शहरातील केएसके महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. त्याचा मृतदेह आज सकाळी बीड शहरालगत असलेल्या शिवदर्यातील तलावात आढळून आला. घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळतात घटनास्थळी ठाणेप्रमुख विश्वास पाटील यांनी धाव घेत मृत्तदेह जिल्हारुग्णालयात शवविच्छदन करण्यासाठी पाठवला. हा तरुण 25 तारखेपासून बेपत्ता असल्याचे समजते. पोलिस अधिक तापास करत आहेत.