Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडमाजलगावात वाळु माफियांचा राज, सादोळ्यात कारवाई करायला गेलेल्या पीएसआयला राजकारण्याचा फोन, कारवाई...

माजलगावात वाळु माफियांचा राज, सादोळ्यात कारवाई करायला गेलेल्या पीएसआयला राजकारण्याचा फोन, कारवाई न करता अधिकारी परत, जिल्हाधिकारी साहेब, आता तुम्हीच सादोळ्यात जा


बीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात सर्वत्र वाळु माफियांनी उच्छाद् मांडला असून माजलगाव तालुक्यातील सादोळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळुचा उपसा करून साठा केला जात असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी आज पोलीस निरीक्षक पदाचा अधिकारी संबंधित ठिकाणी छापेमारी करून माफियांच्या मुसक्या बांधण्याहेतू गेला असता संबंधित पोलीस निरीक्षकास राजकीय दबाव आल्याने कारवाई न करता त्यांना परतावे लागल्याची विश्वसनीय माहिती हाती येत असून संबंधित अधिकारी कारवाई न कररता परत गेल्यानंतर काही स्थानिकांनी थेट रिपोर्टरला वाळु साठ्याचे फोटो पाठवून घडलेल्या घटनेचे कथन केले. याची गंभीर दखल जिल्हाधिकार्‍यांनी घेऊन सादोळ्यातील वाळु साठे ताब्यात घ्यावेत.

kijkkkr


बीड, गेवराई, माजलगाव या तिन तालुक्यात सर्वाधिक वाळुची तस्करी केली जाते. बलाढ्य वाळु माफिया महसूल प्रशासनाला हप्तेखोरीच्या विळख्यात अडकवून आपले धंदे तेजीत करतात. महसूल विभाग काही ठिकाणी थातूरमातूर कारवाई करते. गेवराई आणि माजलगाव वाळु माफियांचे माहेरघर असल्याचे सांगितले जाते.

1234

याठिकाणी एखादा अधिकारी माफियांविरोधात कारवाई करायला निघालाच तर त्याला अटकाव करण्यासाठी राजकीय हत्यार वापरले जाते. माजलगाव तालुक्यातील सादोळ्यात मोठ्या प्रमाणात वाळु उपसा होत असल्याची आणि वाळु साठा असल्याची माहिती एका पोलीस निरीक्षक पदाच्या अधिकार्‍याला झाल्यानंतर संबंधित अधिकारी आज सकाळी सादोळा येथे साठवलेल्या वाळुच्या साठ्या ठिकाणी गेला आणि कारवाई करू लागला मात्र त्याच वेली त्याचा भ्रमणध्वनी वाजला, मातब्बर राजकारण्यांनी कारवाई न करण्याबाबत संबंधिताला सूचना दिली. त्यामुळे तो अधिकारी गपगुमान परत आल्याची माहिती समोर येत आहे. उपस्थित नागरिकांपैकी एकाने रिपोर्टरला थेट वाळु साठ्याचे फोटो पाठविले आणि घडलेल्या घटनेचा आखोदेखा हाल सांगितला. मोठ्या प्रमाणावर वाळुचा साठा असलेले फोटोही त्याने रिपोर्टरला पाठविले. या प्रकरणी आता थेट जिल्हाधिकार्‍यांनीच लक्ष घालून सादोळा या ठिकाणच्या अवैध वाळु साठ्यांवर छापा मारून तो ताब्यात घेत माफियांविरोधात कठोर कारवाई करावी.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!