जाळपोळ; बीड पंचायत समितीचे कामकाज बंद केले
बीड (रिपोर्टर): घाटसावळी येथे मराठा समाजाच्या वतीने शासनाची अंत्ययात्रा काढून रस्त्यावर टायरची जाळपोळ करण्यात आली तर बीड पंचायत समिती कार्यालयाचे कामकाजही दुपारी बंद पाडण्यात आले.
बीड तालुक्यातील घाटसावळी येथे मराठा समाजाच्या वतीने शासनाची अंत्ययात्रा काढून शासनाचा निषेध करण्यात आला. तसेच रस्त्यावर टायर जाळून घाटसावळी बंद करण्यात आली. बीड पंचायत समिती कार्यालयाचे कामकाजही आज बंद करण्यात आले आहे.