कामखेड्यात युवकाची आत्महत्या, पुरग्रस्त कॉलनीत वृद्धाने जीवन संपवले
बीड (रिपोर्टर): मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आजपर्यंत अनेकांनी आत्महत्या केल्या असून हे आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. कोळवाडी येथे आज पुन्हा एका तरुणाने आरक्षणासाठी आपले जीवन संपवले तसेच कामखेडा येथे एका तरुणाने आत्महत्या केली तर पुरग्रस्त कॉलनी येथे एका वृद्धाने लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. या दोन्ही आत्महत्यांचे कारण समजू शकले नाही.
बीड तालुक्यातील कोळवाडी येथील अमोल रोहीदास नांदे (वय 23 वर्षे) या तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या केली. त्याने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना आज सकाळी अकरा वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामीण पोलीस दाखल झाली. दुसरी आत्महत्याची घटना बीड तालुक्यातील कामखेडा येथे घडली. कृष्णा किशोर जमदाडे (वय 22 वर्षे) याने शेतात जावून गळफास घेतला. तिसरी आत्महत्याची घटना बीड येथील पुरग्रस्त कॉलनी भागात घडली. कचरू दगडू वडमारे यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.