नांदूरघाटमध्ये हंगेंना झटका; आडसची ग्रा.पं. आडसकरांकडे
केज (रिपोर्टर): ग्रामपंचायतसाठी काल मतदान झाल्यानंतर आज सकाळपासून त्या त्या तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. केज तालुक्यात 24 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या, दुपारपर्यंत नऊ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले. नांदूरघाटच्या ग्रामपंचायतमध्ये सुनिता युवराज जाधव या सरपंचपदासाठी विजयी झाल्या. यात माजी जि.प. सदस्य संतोष हंगे यांना चांगलाच झटका बसला असून त्यांचा पॅनल पराभूत झाला. तर आडसची ग्रामपंचायत रमेश आडसकर यांच्या ताब्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी काल मतदान झाल्यानंतर आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. केज तालुक्यातील मतमोजणी तहसील कार्यालयामध्ये झाली. 24 ग्रामपंचायतींपैकी 9 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले. संतोष हंगे यांनी नांदूरघाटची ग्रामपंचायत जिंकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली, मात्र यात त्यांचा पराभव झाला. सरपंचपदी सुनिता युवराज जाधव या निवडून आल्या. युसुफवडगाव ग्रामपंचायत बजरंग सोनवणे यांच्या ताब्यात आली असून सरपंचपदासाठी सुलोचना महेश गायसमुद्रे या निवडून आल्या. आडसवर रमेश आडसकर यांचेच वर्चस्व राहिले. योगेश्वरी व्यंकट देशमुख या सरपंचपदासाठी निवडून आल्या. होळची ग्रा.पं.सुद्धा आडसकरांच्या ताब्यात आली. अश्विनी सुरेश शिंदे या विजयी झाल्या. मुळेगावमधून बाळासाहेब लाड, माळेगावमधून रोहीणी गव्हाणे, नायगावमधून गितांजली खोडस, कोल्हेरवाडीमधून प्रमिला मिसाळ आणि सासुरामधून गोविंद पाळवदे हे सरपंचपदासाठी निवडून आले आहेत.