उपस्थितांकडून भुजबळांचे पोलिसांच्या निष्क्रियतेवर सवाल
बीड (रिपोर्टर): 30 ऑक्टोबर रोजी बीड शहरात जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडली. या जाळपोळीत आमदारांसह लोकप्रतिनिधींचे घरे जाळण्यात आले. समता परिषदेचे सुभाष राऊत यांच्या हॉटेलला आग लावण्यात आली होती. सदरची घटना गंभीर असून आज कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांनी बीडमध्ये डेरेदाखल होत घटनास्थळांची पाहणी केली. या वेळी उपस्थितांनी त्या दिवशी बीड जळत असताना पोलिसांनी हातावर हात ठेवून जे होते ते पाहत राहिल्याची तक्रार केली. यावर भुजबळांनी पोलीस अधिक्षकांना जाब विचारला.
आज सकाळी छगन भुजबळ हे संभाजीनगर येथून बीडमध्ये डेरेदाखल झाले. संभाजीनगर रोडवर असलेल्या सुभाष राऊत यांच्या सनराईज हॉटेलला भेट दिली.
र)
30 ऑक्टोबर रोजी मराठा आंदोलनाच्या आड हिंसक प्रवृत्तीच्या लोकांनी सदरची हॉटेल पेटवून दिली होती. या जाळपोळीत हॉटेलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर भुजबळ थेट क्षीरसागरांच्या घरी आणि कार्यालयावर गेले. त्याठिकाणी त्यांनी पाहणी केली. या वेळी उपस्थितांनी जेव्हा घटना घडत होती तेव्हा पोलीस काहीच करत नव्हते, असं म्हणत पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. या वेळी भुजबळांनी जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांना चांगलेच झापले. पुढे भुजबळ माजलगावसाठी रवाना झाले. बीडमध्ये भुजबळांसोबत समता परिषदेचे सुभाष राऊत, योगेश क्षीरसागर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.