बीड (रिपोर्टर): जिल्ह्यातील सर्व गावच्या पोलीस पाटलांची आरक्षण सोडत काल आणि आज उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थीतीत तहसीलदार यांनी काढली आहे. अनेक ठिकाणी खुल्या प्रवर्गातील जागा या राखीव प्रवर्गाला पडल्यामुळे खुल्या प्रवर्गातील पोलीस पाटलांची अडचण झाली आहे.
या पदासाठी शैक्षणिक पात्रताही इयत्ता 12 वी अशी महसूल विभागाने केली आहे. यामध्ये अनुसूचीत जात-जमातीसह महिला प्रवर्गालाही आरक्षणानुसार जागा सोडण्यात आलेल्या आहेत. या पदासाठी जाहिरात येत्या दोन ते तीन दिवसात महसूल प्रशासनाकडून काढण्यात येणार असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात 50 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी या वेळी दिली.











