बीड (रिपोर्टर): केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथून एका मुलीस फूस लावून पळवून नेण्यात आले. या प्रकरणाचा अद्यापही तपास लागला नसून तपास लावण्यात यावा व दोषीविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे.
अमोल शिवाजी शिंदे व दत्ता पिराजी जगताप (रा. दहिफळ वडमाऊली) या दोघांनी एका मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले आहे. या प्रकरणाचा तपास अद्यापही पोलीस प्रशासनाने लावला नाही. तपासासंदर्भात तपासी अधिकारी कुलकर्णी यांच्याकडे विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देत नाहीत. मुलीच्या तपासासाठी भवानवाडी येथील बाळासाहेब केशव सानपसह आदी नागरीक आमरण उपोषण करत आहेत.











