बीड (रिपोर्टर): दुधाचे भाव कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. गाईच्या दुधाला 42 तर म्हशीच्या दुधाला 65 रु. भाव द्यावा या मागणीसाठी आज सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मसाला दूध वाटप लक्षवेधी आंदोलन केले.
गेल्या काही दिवसांपासून दुधाचे भाव कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. दुधाला शासन योग्य भाव देत नाही, शासनाने म्हशीच्या दुधाला 65 व गाईच्या दुधाला 42 रुपये भाव देऊन शेतकर्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. या वेळी गणेश ढवळे, शेख युनुस, शेख मुश्ताक, सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार, रामनाथ खोड, बाळासाहेब मोरे, बाळसिंह परदेशी, मच्छिंद्र शिंदे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.











