लोकसंख्येनूसार आरक्षण काढले नसल्याचा अनेक ठिकाणी होता आक्षेप
बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील भरती प्रकिया राबवण्यात येणार असून त्यापूर्वी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. आरक्षणाच्या सोडतीनंतर काही ठिकाणी लोकसंख्येनूसार आरक्षण काढले नसल्याचा आक्षेप आल्यानंतर या बाबत जिल्हा प्रशासनाने दखल घेवून उद्या पुन्हा आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. बीड तहसिलमध्ये दुपारी 2.30 वाजता बीड,गेवराई, शिरुर कासार या तिन तालुक्याचे आरक्षण काढण्यात येणार आहे.
गृहविभागाच्यावतीने राज्यातील पोलीस पाटील पदाची भरती प्रकिया राबवण्यात येणार आहे. भरतीपूर्वी 7 डिसेंबर रोजी जिल्ह्यात आरक्षणाची सोडत घोषीत करण्यात आली होती. आरक्षण काढल्यानंतर काही ठिकाणी आक्षेप नोंदवण्यात आले होते. लोकसंख्येच्या आधारे आरक्षण सोडत झाली नसल्याचया तक्रारी आल्यानंतर याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली. व उद्या पुन्हा 22/12/2023 रोजी आरक्षण सोडत प्रकिया काढण्यात येणार आहे. बीडच्या तहसिल कार्यालयात दुपारी 2.30 वाजता बीड, गेवराई आणि शिरुर का. या तीन तालुक्याचे आरक्षण काढण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी करिश्मा नायर यांनी म्हटले आहे.











