सां.बा.विभागाला इमारतीची कळा माहित नव्हती का?
बीड(रिपोर्टर)ः- नगर रोडवर बीड तहसिलची इमारत आहे. या इमारतीला अनेक वर्ष झाले. सदरील इमारत मोडकडीस आल्याने ति पाडून नविन इमारत बांधण्यात येणार आहे. इमारत मोडकळीस आलेली असतांना त्या इमारतीच्या डागडुजीवर तिस लाख रुपयापेक्षा जास्तीचा निधी खर्च करण्यात आला. सदरील हा खर्च सार्वजनीक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आला.इमारत पाडण्यात येणार असे माहित असतांना बांधकाम विभागाने इतका मोठा खर्च केला म्हणजे आश्चर्य व्यक्त होत आहे. शासनाला लाखो रुपयाचा चुना लावल्याने या प्रकरणी बांधकाम विभागाची चौकशी व्हायला हवी.
गेल्या अनेक वर्षापूर्वी नगर रोडवर तहसिल कार्यालयाची इमारत बांधण्यात आली. या इमारतीमध्ये तहसिलसह भुसंपादन, पुरवठा विभाग यासह अन्य कार्यालय आहे. इमारत धोक्यादायक बनल्याने ति पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे. तहसिलमधील सर्व कार्यालय इतर ठिकाणी हलवण्यात येणार आहे. तहसिलची इमारत धोकादायक बनलेली आहे. ती पाडण्यात येणार हे माहीत असतांनाही गेल्या काही महिन्यापूर्वी या इमारतीच्या डागडुजीवर 30 लाख रुपयापेक्षा जास्तीचा खर्च करण्यात आला. इमारत पाडण्यात येणार आहे. तरीही इतका खर्च का करण्यात आला. गुत्तेदारांना पोसण्यासाठी की अधिकार्यांना मलिदा लाटण्यासाठी इतका मोठा खर्च करण्यात आला या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. सार्वजनीक बांधकाम विभागाला इमारत पाडण्यात येणार हे माहित नव्हतं का? दरम्यान 30 लाखापेक्षा जास्तीचे इस्टीमेंट बनवण्यात आले होते. त्यातील किती खर्च झाले आणि इमारतीची डागडुजी नेमकी काय केली? हा ही प्रश्नच आहे.