बीड (रिपोर्टर): सर्वसामान्य नागरीकांच्या हजारो कोटींच्या ठेव्या घेऊन बीड जिल्ह्यातल्या जिजाऊ मॉ साहेब, ज्ञानराधा, लक्ष्मीमाता, राजस्थानी, छत्रपती मल्टिस्टेट बँकेच्या संचालक मंडळाने ठेवीदारांना वार्यावर सोडले. त्या ठेवीदारांच्या हक्काच्या पैशासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने लढा उभारला असून लवकरच याबाबत ठेवीदारांसोबत महामोर्चाचे नियोजन होत आहे. तत्पूर्वी सर्व ठेवीदारांनी आपआपल्या ठेवींचे झेरॉक्ससह नाव, मोबाईल नंबर शिवसेना (उबाठा) यांच्या मध्यवर्ती कार्यालयात आणून द्यावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी केले आहे.
गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये बीड शहरासह जिल्हाभरातून मल्टिस्टेट बँका सर्वसामान्यांच्या हजारो कोटींच्या ठेव्या घेऊन बंद पडल्या आहेत. लोकांचे पैसे ते देत नाहीत. बीडमधील जिजाऊ मॉ साहेब, लक्ष्मीमाता, ज्ञानराधा, त्याचबरोबर शहराबाहेरील राजस्थानी, छत्रपती मल्टिस्टेट या मल्टिस्टेट बँकांमध्ये कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर दिनदुबळ्यांच्या हजारो कोटींच्या ठेवी अडकल्या आहते. त्या सर्व लोकांचा आवाज म्हणून उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी आवाज उठवला आहे. सर्वसामान्यांचे पैसे मिळावेत यासाठी वरेकर रस्त्यावर आणि कायदेशीर लढाई लढू पाहत आहेत. त्या अनुषंगाने ज्या लोकांचे पैसे बँकांमध्ये अडकले आहेत त्यांनी त्यांच्या ठेवींचे झेरॉक्स आणि आपले नाव व मोबाईल नंबर उबाठा शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये नोंदवावेत, असे आवाहन गणेश वरेकर यांनी केले आहे.











