• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

आता सरकारनं गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

by गणेश सावंत
December 27, 2023
Reading Time: 1 min read
0
आता सरकारनं गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

छत्रपती संभाजीनगर (रिपोर्टर): सरकारच्या डोक्यात जे आहे, ते सरकार करतंय. जनतेच्या मनातलं सरकार करत नाही. मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याची आमची भूमिका आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे असे लाखो पुरावे आहेत. मग कशाला आम्हाला फुफाट्यात ढकलताय? मराठा समाज ओबीसीमध्ये आहे. महाराष्ट्रातल्या सरसकट समाजाला ओबीसीतील हक्काचे आमचे आरक्षण द्यावे. सरकार धरसोड करतंय. सरकार आरक्षण देईल वाटत नसल्याने आम्ही मुंबईला चाललोय. आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही. मराठा समाज इतका घरातून बाहेर पडणार आहे की, गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.


    छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे म्हणाले की, मुंबईला गेल्यावर आता माघारी नाही. मी जे जे बोललो ते केले आहे. मी माझ्या समाजासाठी पूर्ण ताकद पणाला लावायची माझी तयारी आहे.वेळेप्रसंगी जीव गेला तरी चालेल. जर ही संधी गेली तर मराठा पोरांचे खूप हाल होणार आहेत. आरक्षण मिळाले नाही तर भविष्यात खूप नुकसान होणार आहे. मराठ्यांनी सावध व्हा, सर्वांनी घरे सोडा. आज केले नाही तर कधीच होणार नाही. नाईलाज असल्याने आम्हाला मुंबईला यावे लागणार आहे. मराठ्यांनो घरी बसू नका. आपल्या लेकरांसाठी आरक्षण घ्यायचे आहे. 20 तारखेपासून अंतरवालीतून पायी निघायचे आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतायचे नाही असं आवाहन त्यांनी केले. त्याचसोबत प्रकाश शेंडगे ज्येष्ठ नेते त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागतोय. शेंडगेंनी गोरगरीब धनगरांना आरक्षण मिळावे यासाठी शक्ती पणाला लावावी. मराठा समाजही त्यांच्यासोबत आहे. विनाकारण त्यांनी शक्ती वाया घालवू नये. ते चळवळीतून आलेले नेते आहेत. त्यांच्याविषयी आणखी काय बोलणार नाही अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिली आहे.

गृहमंत्री फडणवीसांना इशारा
मराठा समाजाने ठरवलंय, आपण आहोत तोपर्यंत लेकरांना आरक्षण मिळवून द्यायचे. सरकारला काय करायचे ते करावे. गुन्हे दाखल करून सरकारला नरेंद्र मोदींकडून पाठ थोपटून घ्यायची असेल. येडपाटाचे ऐकायचे म्हणून सरकार हे करतंय. सरकारनं शहाणे व्हावे. मराठ्यांशिवाय काही होऊ शकत नाही हे सरकारनं समजून घ्यावे. जर खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाज दबला असता तर बीडमध्ये लाखोंचा जनसागर उसळला नसता. विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाजाची नाराजी देवेंद्र फडणवीसांनी ओढावून घेऊ नका. कोणतेही ट्रॅक्टर रोखू नका. अंतरवालीसारखा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नका. कोट्यवधी मराठा एकत्र आलाय त्यामुळे ते सरकारला जड जाईल असा इशारा जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

दरम्यान, मी पण हिंदू आहेच. मराठा आरक्षण हा सामाजिक प्रश्‍न आहे. राम मंदिराचे उद्घाटन त्यावेळी आहे. हा प्रत्येकाच्या आनंदाचा सोहळा आहे. 18 तारखेपर्यंत मुंबईत 144 लागू आहे त्यामुळे 20 जानेवारीला मुंबईत जाणार हे घोषित केले. 20 तारीख केवळ सरकार 5 महिने आरक्षण लांबवत आहे म्हणून धरली आहे असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केले. 

Previous Post

दिंद्रुडचे सरपंच कोमटवार यांचे जात प्रमाणपत्र रद्द

Next Post

पिंपरखेड येथून 65 हजार रुपयांचा कापूस चोरून नेला

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
चोवीस तासात पाच जणांचा मृत्यू ,गेट अंगावर पडल्याने पाच वर्षीय मुलगा दगावला

पिंपरखेड येथून 65 हजार रुपयांचा कापूस चोरून नेला

ताज्या बातम्या

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?