Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडकेजकेजच्या चारही वॉर्डात निवडणूक प्रतिष्ठेची होणार

केजच्या चारही वॉर्डात निवडणूक प्रतिष्ठेची होणार


तिरंगी लढत, बजरंग सोनवणे, हारुण इनामदार यांनी लावली ताकद

केज (रिपोर्टर) केजमध्ये चार वॉर्डात निवडणूक होत असून या चारही वॉर्डात दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. वॉर्ड क्र. २ मध्ये बजरंग सोनवणे यांच्या मुलीचा अर्ज दाखल आहे. तर वॉर्ड क्र. ८ मध्ये हारुण इनामदार यांच्या पत्नीचा अर्ज आहे. एकूण ६० उमेदवार रिंगणात असल्याने यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, आघाडी आणि शिवसेनेचे उमेदवार आहेत.


ओबीसी आरक्षणाच्या घोळामध्ये चार वॉर्डातील निवडणुका पाठीमागे राहिलेल्या आहेत. सदरील जागेवर निवडणुका घेण्याचे आदेश आयोगाने दिल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया पुर्ण झाली असून १८ तारखेला मतदान होत आहे. ४ वॉर्डात ६० उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. चारही वॉर्डात प्रतिष्ठेचे झाले असून वॉर्ड क्र. २ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची कन्या हर्षदा बजरंग सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर वॉर्ड क्र. ८ मध्ये हारुण इनामदार यांच्या पत्नीचा अर्ज आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, जनविकास आघाडी आणि शिवसेना या चारही पक्षांचे उमेदवार निवडणुकीत उतरलेले आहेत. शिवसेनाही गिरीष देशपांडे यांच्या नेतृत्वात निवडणुकीत तयारीनिशी उतरली आहे.

Most Popular

error: Content is protected !!