किरायदाराच्या कड्या लावून चोरटे घसले
केज शहरातील घटना
केज (रिपोर्टर): वृद्ध दाम्पत्याच्या घरामध्ये चार चोरट्यांनी घुसून दोघांनाही मारहाण करत घरातील तीन ते साडेतीन हजार रुपये नगदी लुटून नेल्याची घटना मध्यरात्री सहयोगनगर उमरी रोडवर घडली. चोरट्याने किरायदाराच्या कड्या लावून दाम्पत्याच्या घरामध्ये प्रवेश केला. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
मोहन विश्वनाथ दांगट (रा. उमरी रोह, सहयोगनगर) यांच्या घरी रात्री तीन ते चार चोरट्यांनी प्रवेश केला. घरामध्ये घुसल्यानंतर त्यांनी या दोघांना मारहाण करत जखमी केले. घरामधील तीन ते साडेतीन हजाराचा नगदी ऐवज चोरट्यांनी लुटून नेला. घरात घुसण्यापूर्वी चोरट्यांनी आजुबाजुच्या घरांना कड्या लावल्या होत्या. या प्रकरणी दुपारपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.











