बीड, (रिपोर्टर)ः- मोटारसायकलवर जात असतांना पाठीमागे बसलेल्या पत्नीची साडी गाडीच्या चाकात अडकल्याने दोघे पती पत्नी खाली पडून जखमी झाले. दोघांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान पतीचा मृत्यु झाला. या अपघाताची घटना खापरवाडी फाट्याजवळ घडली.
शेख महेबुब हमीद (वय 60) व त्यांची पत्नी हे दोघे मोटार सायकल क्र.एम.एच.28.पी 0543 यावर लहूळ ते पार्डी माटेगाव रोडने जात असतांना खापरवाडी फाट्याजवळ मागच्या चाकात साडी अडकल्याने दोघही खाली पडून जखमी झाले. दोघांना उपचारार्थ रूग्णालयता दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शेख हमीद यांचा मृत्यु झाला आहे.











