बीड(रिपोर्टर): सायं.दै. बीड रिपोर्टर परिवाराच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सकाळी 10 वा. सुरू झालेल्या या महाशिबिरात दुपारी 1:30 वाजेपर्यंत तब्बल 113 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदरचे रक्तदान शिबिर हे सायंकाळी 5 वाजेपर्यंत असल्याने रक्तदाते मोठ्या संख्येने रक्तदान करण्यासाठी रिपोर्टर भवन परिसरात गर्दी करून आहेत.
रिपोर्टर परिवाराच्या वतीने दरवर्षी महारक्तदान शिबिर आयोजित केले जाते. गेल्या सात वर्षाच्या कालखंडात प्रत्येक शिबिरात दीडशेपेक्षा अधिक रक्तदाते रक्तदान करत आले आहेत. या वर्षीही या महारक्तदान
शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज सकाळी 10 वा. सायं.दै. बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांनी रक्तदान करून शिबिरास सुरूवात केली. सकाळपासून दुपारी 1:30 वाजेपर्यंत तब्बल 113 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे महारक्तदान शिबिर सुरू असणार असल्याने रिपोर्टर भवन परिसरात मोठ्या प्रमाणावर रक्तदाते उपस्थित आहेत. सामाजिक बांधिलकी जपत रिपोर्टर परिवार सातत्याने विविध उपक्रम राबवत आलेले आहेत.











