तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यंची प्रचंड गर्दी; येणार्या निवडणुकीत महायूतीचे उमेदवार निवडून आणू
बीड (रिपोर्टर): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे पर्व आणि राज्यातील शिंदे-पवार-फडणवीस सरकारचे विकास कामे आणि त्यांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी महायूतीचा कार्यकर्ता मेळावा बीडमध्ये सुरू झाला असून व्यासपिठावर राष्ट्रवादी-भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात बीडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्रित येवून महायूतीचा कार्यकर्ता मेळावा यशस्वी झाल्याचे सिद्ध केले. वेळेअभावी यातील मान्यवर धनंजय मुंडे, प्रितम मुंडे यांचे भाषण देता आले नाही.
बीड शहरातल्या आशिर्वाद लॉन्स या ठिकाणी महायूतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यास आज दुपारी 1:30 वा. सुरूवात झाली. या मेळाव्यासाठी राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, खा.प्रितम मुंडे, राष्ट्रवादीचे नेते तथा महायुतीचे समन्वयक अमरसिंह पंडित, आ.प्रकाश सोळंके, आ.आजबे, माजी आ.सुरेश नवले, आर.टी. देशमुख, दौंड, राजेंद्र मस्के, सचिन मुळूक, नारायण काशीद, कुंडलीक खांडे, अनिल जगताप, योगेश क्षीरसागर, बबन गवते, रमेश आडसकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. सदरचा मेळावा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे पर्व घराघरात पोहोचविण्यासाठी आणि राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे विकास कामे लोकांच्या दारोदारी नेत त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्याहेतू सदरच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून राष्ट्रवादी काँग्रेस, भजापा आणि शिवसेना या तीन पक्षाच्या कार्यकर्त्यांत मनोमिलन व्हावे आणि येणार्या लोकसभा निवडणूकीसह अन्य निवडणूकांमध्ये महायूतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून यावेत यासाठी प्रयत्न व्हावेत म्हणून या मेळाव्याचे प्रयोजन आहे. सदरचा मेळावा हा सुरू झाला असून व्यासपिठावरील मान्यवरांची भाषणे वेळेअभावी या ठिकाणी देता आली नाहीत.











