• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मराठ्यांनो!मी तुमच्यात असेल नसेल, आंदोलन सुरू ठेवा;लढाई टोकाची, गोळ्या घातल्या तरी माघार नाही

by गणेश सावंत
January 20, 2024
Reading Time: 1 min read
0
मराठ्यांनो!मी तुमच्यात असेल नसेल, आंदोलन सुरू ठेवा;लढाई टोकाची, गोळ्या घातल्या तरी माघार नाही
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

सराटी अंतरवली (रिपोर्टर): शरीर साथ देत नाही, पण लढाई टोकाची आहे, मी तुमच्यात असेल नसेल तरीही मराठ्यांनी आंदोलन सुरू ठेवावे, आता लढाई टोकाची, गोळ्या घातल्या तरी माघार नाही, असा निर्वाणीचा इशारा आणि मराठ्यांना आवाहन करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर सडकावून टीका करताना मराठा समाजाने सरकारला सात महिने वेळ दिला तरी त्यांनी आरक्षण दिले नाही. आता आरक्षणाशिवाय माघार नाही. मराठ्यांचं बलिदान आठवल्याने डोळ्यात पाणी आलं. आरक्षण मिळालं नाही तर मराठ्यांनो नेत्यांच्या राजकीय करिअरचा सुफडासाफ करा, ते जर या मोर्चात ट्रॅप रचत असतील तर आम्हीही टप्पे पाडलेत, असेही जरांगे म्हणाले.


मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला निघण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते भावूकही झाले तसंच आक्रमही झाल्याचं पाहण्यास मिळाले. प्राण गेला तरीही आता मागे हटणार नाही. मराठा समाजाने सरकारला सात महिने वेळ दिला आहे. तरीही आरक्षण मिळालेलं नाही, त्यामुळे मुंबईला गेल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सात दिवसांमध्ये आम्ही मुंबईला पोहचणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, माझं शरीर मला उपोषणामुळे साथ देत नाहीये. पण मी असो किंवा नसो मराठ्यांची एकजूट मोडू नका. आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आमचं आंदोलन मुंबईत पोहचल्यावर कोट्यवधी मराठे मुंबईत दिसणार आहेत. राज्यभर आम्ही आमच्या तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये लढणार आहोत. ही आरपारची लढाई आहे कुणी घरी राहू नका अशी माझी मराठा बांधवांना विनंती आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सरकारशी काहीही चर्चा झालेली नाही. आमचं म्हणणं सरकारला माहीत आहे. चर्चा किती दिवस करणार? सरकार मराठ्यांना वेठीस धरणार असेल आणि तर आम्ही आजपासूनच उपोषण करत मुंबईला जाणार असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. याबाबत माझ्या समाजाशी बोलून याबाबत निर्णय घेणार आहे. आम्ही सामंज्यसाची भूमिका घेतल्यानेच आम्ही सात महिने वेळ दिला आहे.आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. या आंदोलनात शेकडो मराठे शहीद झाले आहेत. अनेक माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं आहे. अनेक घरांमधला कर्ता पुरुष गेला आहे. परंतु त्यानंतर सरकारने आरक्षण दिले नाही. आपली मुले मरत असताना सरकारला झोप कशी येते? सरकार इतके नालायक असू शकते का? सरकार निर्दयी आहे. निष्ठूर आहे. मराठा समाजाबद्दल हा सर्व विचार करताना मला रात्ररात्र झोप येत नाही. यामुळे आता आरपारची लढाई करण्याचा निर्णय मी घेतला आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. 54 लाख नोंदी मिळाल्या आहेत. 45 वर्षांपासून लढा सुरु आहे. सरकार इतकं निर्दयीपणे कसं वागू शकतं. ज्या सरकारला मराठ्यांनी गादीवर बसवलं, आज नोंदी मिळालेल्या असताना आरक्षण देऊ शकत नाही? गोरगरीबांची पोरं मरत असताना त्यांना हक्काचं आरक्षण का देत नाही? हा अन्यायाचा कळस झाला आहे. डोळ्यांदेखत आत्महत्या होत आहेत तरीही सरकारला झोप कशी लागते? मुंबईत काहीही झालं तरीही हरकत नाही आम्ही मागे फिरणार नाही. पैठणचा एक मराठा बांधव याचा मुलगा तीन महिन्यापूर्वी गेला. तरीही त्याने मला येऊन सांगितलं माझा मुलगा गेला असला तरीही आपण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसायचं नाही. सरकार इतकं नालायक असू शकतं का? पोरांचे बळी जाऊनही ते हक्काचं आरक्षण देत नाही? असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. आता मी शहीद झालो तरी माघार नाही. माझ्या छातीवर गोळ्या पडल्या तरी मागे हटणार नाही. मराठयांसाठी टोकाचे पाऊल उचलणार आहे. सरकारच्या दारात मरण आले तरी आता माघार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Previous Post

मोहीम फत्तेसाठी मराठ्यांची मुंबईकडे कूच;धुळे-सोलापूर महामार्गावर भगव्या ध्वजातल्या मराठ्यांचं वादळ

Next Post

जनावरे बांधण्यावरून पती-पत्नीस मारहाण;पत्नीचा विनयभंग, चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण ;तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; तागडगाव येथील गायरान घडली घटना

जनावरे बांधण्यावरून पती-पत्नीस मारहाण;पत्नीचा विनयभंग, चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?