बीड (रिपोर्टर) – अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक केज तालुक्यातील युसूफ वडगाव हद्दीत सोमवार (दि.5) रोजी पकडण्यात आला.हि कारवाई पोलीस अधीक्षक पथक प्रमुख गणेश मुंडे यांनी केली.याप्रकणी एकाला ताब्यात घेत तब्बल 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
केज तालुक्यातील युसूफ वडगाव हद्दीतून कळंबला अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.माहिती मिळताच त्या भारत बेंझ कंपनीचा 12 टायरी ट्रक पोलिसांनी सोमवार (दि.5) रोजी पहाटेच्या सुमारास पकडला.याप्रकरणी एक जनाला ताब्यात घेऊन तब्बल 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.हि कारवाई पोलीस अधीक्षक पथक प्रमुख गणेश मुंडे यांच्या पथकाने केली.गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती .












