बीड (रिपोर्टर): जिल्हाप्रमुखपदी गणेश वरेकर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पक्षवाढीसाठी मोठ्या जोमाने प्रयत्न सुरू केले. ग्रामीण भागासह शहरी भागात शाखा स्थापन करून तरुणांना उबाठा सेनेमध्ये प्रवेश देण्याचा सपाटा सुरू केला. पेठ बीड भागातील अनेक मुस्लिम-बौद्ध तरुणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या तरुणांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपर्क नेते सुनील प्रभू, संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, युवा सेना कोअर कमिटीचे अंकीत प्रभू, जिल्हाप्रमुख सातपुते, जिल्हा संघटक नितीन धांडे आदींच्या उपस्थितीमध्ये काल पेठ बीड भागामध्ये अनेक मुस्लिम, बौद्ध तरुणांनी उबाठा सेनेमध्ये प्रवेश केला. या वेळी राजू महुवाले, रामराजे साळुंके, गोरख शिंगण, शेख निजाम, गजानन कदम, रवी वाघमारे, सय्यद नय्यू, जोगदंड, शेख कलीम, बेग राजू, शेख अझहर, गणेश ढोरमारे, हबीब चाऊस, सय्यद अखिल, शेख समीर, सय्यद इद्रिस, पठाण फैजान, शेख इब्राहीम, शेख जहुल, शेख अकबरसह आदींची उपस्थिती होती. दरम्यान, मौलाना युनुस कॉलनी गांधीनगर येथे शाखा स्थापन करण्यात आली. या वेळी किशोर पोतदार म्हणाले की, देशातील व राज्यातील विद्यमान सरकार व मोदी-शहा संविधान पायदळी तुडवून लोकशाही संपविण्याचे षडयंत्र रचत आहेत. आपल्याला संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी शिवसेनेच्या आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे लागणार आहे. या वेळी अंकित प्रभू म्हणाले की, राज्यात भाजपाला व मिंदे सरकारला गाढण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सक्षम नेतअत्व असून हिंदू समाजासोबतच मुस्लिम-बौद्ध समाजामध्ये त्यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती असून या सहानुभूतीत राज्यातील मिंदे सरकार दिल्लीचे हुकुमशहा मोदी-शहा यांचे सरकार घालवणार आहे. जिल्हाप्रमुख गणेश वरेकर म्हणाले की, गद्दारांचे सरकार उलथवून टाकण्यासाठी ठाकरे यांना साथ देण्याची गरज आहे. सदरील शाखा उद्घाटन व पक्षप्रवेशाचा कार्यक्रम रवी वाघमो यांच्या नियोजनातून आयोजीत करण्यात आला होता. यामध्ये अनेक मुस्लिम-बौद्ध तरुणांनी उबाठा सेनेत प्रवेश केला आहे.












