बीड (रिपोर्टर): कापूस व्यापार्याचे घर फोडून तीन लाखांची रोकड लंपास केल्याची घटना तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रोहीतळ येथे काल रात्री तीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस हद्दीतील असलेल्या रोहीतळ गावात कापसाचे व्यापारी शिवलिंग कचरू गायकवाड यांच्या घरी काल रात्री तीनच्या सुमारास त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोने-चांदीच्या ऐवजासह तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेची माहिती मिळताच तलवाड्याचे बिट अमलदार भगवान खाडे, सुरेश बहीरवाळ व पोलीस अमलदार नारायण पिसाळ यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात कलम 457, 379 भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तलवाडा पोलीस करत आहेत.












