बीड (रिपोर्टर) – महालक्ष्मी चौकापासून नजीकच्या अंतरावर असणार्या हॉटेल चंद्रलोकजवळ आज (दि.6) सकाळी 6 च्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार (एम.एच.01 बी.टी.6144) आणि स्कार्पिओ (एम.एच.23 बी.सी.4313) ची स्मोरासमोर धडक होऊन भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यात दोन्ही गाड्या चक्काचूर झाल्या असून चौघे गंभीर जखमी झाले.विशेष म्हणजे स्विफ्ट कारमधून गुटख्याची तस्करी सुरु होती.सकाळी अपघात घडल्यानंतर नागरिकांनी गुटखा घेऊन जाण्यासाठी प्रचंड गर्दीच गर्दी केल्याची माहिती आहे.
बीड बायपासजवळ असणार्या महालक्ष्मी चौकापासून नजीकच्या अतंरावर हॉटेल चंद्रलोक आहे.या हॉटेलसमोर आज सकाळी 6 च्या सुमारास स्विफ्ट कार आणि स्कार्पिओची समोरासमोर धडक झाली.या अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले.या घटनेत चौघे जण जखमी झाले असून यातील दोघांना खाजगी तर दोघांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.दरम्यान स्विफ्ट कारमधून गुटख्याची तस्करी सुरु होती.ही कार कुठे जात होती ?गुटखा कोणाचा होता ?गाडी मालक आणि चालक कोण याची अद्याप माहिती समोर आलेली नसून बीड ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.












