बीड (रिपोर्टर): जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिक दुेकाळाच्या खाईत होरपळत आहेत. नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना आखाव्यात, आी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुतेंसह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
बीड जिल्ह्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ लागलीय. रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला. जनावरांच्या चार्याची टंचाई जाणवू लागली. दुष्काळी उपाययोजना आखण्यासाठी प्रशासनाने तात्काळ मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. या वेळी या वेळी गजानन कदम, रविराज बडे, हनुमान जगताप रतन गुजर, मुकुंद शिंदे, सुभाष राऊत, शिवप्रसाद जाधव, आोक पवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती. उपाययोजना न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करर्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान गुरांच्या चावण्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात, टँकरने पाण्याचा पुरवठा करावा यासह इतर मागण्यांचे निवेदन शिसेनेच्या वतीने देण्यात आले.












