सोन्नाखोट्टा फाट्याजवळ धरारक घटना ; अज्ञात सहा आरोपी विरोधात गुन्हा दाखल
तपासासाठी दोन पथके तयार ; एलसीबी घटनास्थळी दाखल
वडवणी, (रिपोर्टर)ः-कापसाचे पैसे घेवून गावाकडे निघालेल्या एका व्यापार्याच्या मोटार सायकलला गाडी आडवी लावून त्याला मारहाण करून त्यांच्या जवळील 51 लाख रूपये जबरदस्तीने लुटून नेल्याची खळबळ जनक घटना सोन्नाखोट्टा फाट्याच्या जवळील खडी क्रशर जवळ घडली. या प्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात अज्ञात सहा चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.चोरट्यांच्या तपासासाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली. घटनास्थळी एलसीबीचे साबळे यांनी भेट दिली आहे.
शामसुंदर आण्णासाहेब लांडे (रा.घाटसावळी)हे कापसाचे व्यापारी आहेत. त्यांनी केज येथील माऊली जिनिंगला आठ ट्रक कापुस 760 क्विंटल टाकला होता. कापसाचे पैसे आणण्यासाठी लांडे जिनिंगमध्ये गेले होते. पैसे घेवून ते मोटार सायकल क्रं. एम.एच.05.सी.डी.8465 यावर गावाकडे येत होते. केज, धारूर, चोरंबा येथील महामार्गावर सोन्नाखोट्टा फाट्याच्या पुढे खडी क्रशर जवळ त्यांना पाठीमागून दोन अनोखळी इसमाने गाडीआडवी लावली. या दोघांनी आपले चेहरे बांधलेले होते. गाडी आडवी लावल्याने लांडे यांनी आपली गाडी थांबवली त्यावेळी त्यांचा तोल लावून ते खाली पडले. तितक्यात पाठीमागून पांढर्या रंगाची स्विफट कार आली. या कारमधील लोकांनी लांडे यांना मारहाण करत त्यांच्या जवळील 51 लाख रूपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी त्यांनी वडवणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपासासाठी दोन पथके नियुक्त करण्यात आले. घटनास्थळी एलसीबीचे प्रमुख संतोष साबळे हे दाखल झाले होते.












