बीड (रिपोर्टर): कंकालेश्वरच्या कुंडात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी तीनच्या सुमारास घडली. रविंद्र मेहेत्रे असे या युवकाचे नाव आहे.
शिव पार्वती ड्रेसेसचे मालक रविंद्र मेहेत्रे (वय 30) या युवकाने काल दुपारी 3 च्या सुमारास कंकालेश्वरच्या कुंडात उडी टाकून आत्महत्या केली. आज सकाळी त्याचा मृतदेह कुंडातून बाहेर काढण्यात आला. मृताच्या पार्थीवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. रविंद्र मेहेत्रे हे न्यूमोनियाच्या आजाराने त्रस्त होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.












