वरिष्ठांच्या नावाखाली जोरदार वसूली सुरु
मुंबई, संभाजीनगर एसीबीकडे करणार तक्रार – संतोष सोहनी
बीड : जिल्ह्यात छोटे मोठे व्यापारी दिवसराञ व्यवसाय वाढविण्यासाठी कष्ट घेतात, परंतू काही अधिकारी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत व्यापार्यांना ञास देत आहेत. येथील अन्नभेसळ अधिकारी संदीप देवरे यांनी येथील तीन चार व्यापार्यांना पैशाची मागणी करत विनाकारण ञास दिल्याप्रकरणी व्यापारी महासंघाच्या वतिने आज (ता. 08) जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाअध्यक्ष संतोष सोहणी, शहरअध्यक्ष विनोद पिंगळे, किशोर शर्मा यांच्यासह इतरांची उपस्थीती होती.
बीड शहरातील अनेक व्यापार्यांना विनाकारण ञास देण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत. येथील अन्नभेसळ अधिकारी दिपक देवरे हे गेल्या काही दिवसापासून येथील व्यापार्यांना विनाकारण ञास देत आहेत. वारंवार ञास होत असल्यामुळे येथील व्यापार्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली. यावेळी किशोर शर्मा, बापू कुटे यांच्यासह इतरांना पैशाची मागणी केली होती. कोणाला 16 हजार कोणाला 20 हजाराची मागणी करण्यात आली होती. यासर्व बाबींच्या अनुषंगाने व्यापारी महासंघाच्या वतिने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संतोष सोहनी, शहराअध्यक्ष विनोद पिंगळे यांच्यासह इतरांची प्रमुख उपस्थिती होती. यासह या प्रकरणाची तक्रार संभाजीनगर व मुंबई एसीबीकडे करणार असल्याचे मत व्यापारी महासंघाचे संंतोष सोहनी यांनी सांगितले.












