मुंबई, (रिपोर्टर)ः- राजकिय दृष्टदया संवेदशशिल असलेल्या महाराष्ट्रात आज पुन्हा राजकीय धरनिकंप झाला. या धरनिकंपाचे हादरे काँग्रेसला बसले नव्हे तर या हादर्याने महाराष्ट्रातली उरली सुरली काँग्रेसची राजकीय इमारत अक्षरशः ढासळून गेली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेस सदस्यताचा राजीनामा दिला. एवढेच नव्हे तर त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिल्याचे विश्वसनीय सुत्राकडून समजते. अशोक चव्हाण हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसापासुन सुरू आहे. त्या चर्चेला आता पुर्नविराम मिळण्याची शक्यता असुन अशोक चव्हाण हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते तसे राजकीय गोटात प्रचंड चर्चा सुरू आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर आजच फडणवीस यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, काँग्रेसमधील अनेक चांगले नेते, हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करत आहे. त्यातून जनतेशी घट्ट जोडलेल्या नेत्यांची सध्या घुसमट होतेय. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे लोकनेते भाजपात प्रवेश करत आहेत. काही मोठे नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मी आता एवढंच म्हणेन, आगे आगे देखिये होता है क्या
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी आमदारकीचाही (विधानसभा सदस्यत्वाचा) राजीनामा दिला आहे. तसं पत्र त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिलं आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पटोले हे काँग्रेस हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
आमदारकीचाही राजीनामा
अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब करणारं एक पत्र सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या पत्रात चव्हाण यांच्या नावापुढे माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख आहे. याचाच अर्थ चव्हाण यांनी आधीच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, त्यापाठोपाठ त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नाना पटोल यांना लिहिलेल्या पत्रात अशोक चव्हाण यांनी लिहिलं आहे की, महोदय, मी दिनांक 12 फेब्रुवारी 2024 मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा या पत्राद्वारे सादर करत आहे.












