वडवणी (रिपोर्टर):- मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणार्थ उद्या सकल मराठा समाजाच्या वतीने वडवणी शहरासह तालुक्याची हाक देण्यात आली आहे.तर उद्याचा आठवडी बाजार देखील बंद राहणार आहे.अशी माहिती समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.
मराठा समाजातील सगेसोयरे असणाऱ्या नातलगाना देखील ओबीसी प्रवर्गातून कुणबीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे यांची अंमलबाजावणी सरकारने तात्काळ सुरु करावी तसेच मराठा आरक्षणाचे संघर्ष योध्दे मनोज जरांगे पाटील हे अतरवली सराटी याठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा अमरण उपोषणाला बसले आहेत. यांच्या सन्मार्थ उद्या सकल मराठा समाजाच्या वतीने वडवणी शहरासह तालुका बंदाची हाक देण्यात आली आहे.तर उद्याचा आठवडी बाजार देखील बंद राहणार असून या बंदात शहर आणि तालुक्यातील व्यापारी बांधवानी स्वयंपुर्तेनी सहभाग घेऊन बंद यशस्वी करावा तसेच उद्या वडवणी शहरात आठवडी बाजार भरत आसतो. हा बाजार देखील बंद ठेवण्यात आला आहे. यामध्ये देखील विविध व्यापारी वर्गानी देखील बंदात सहभागी व्हावे असे आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.












