बीड (रिपोर्टर): महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून परिवहन महामंडळाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.
सन 2018 पासून प्रंबीत असलेला महागाई भत्ता देण्यात यावा, सातवा वेतन तात्काळ लागू करावा, हिट अॅण्ड रन कायदा रद्द करावा, वाढीव वेतनामधल्या त्रुटी दूर कराव्यात, मुदत संपलेल्या एसटी बसेस तात्काळ बंद कराव्यात, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकार्यांनी आजपासून बेमुदत उपोषण पुकारले आहे.












