बीड (रिपोर्टर): बीड तालुक्यातील मौजवाडी शिवारात अवैध दारू साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
मौजवाडी (ता. जि. बीड) गावात छगन सौदागर चव्हाण हा देशी-विदेशी दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकून 6 हजार 280 रुपयांचा विना परवाना देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












