बीड (रिपोर्टर): केज तालुक्यातील साळेगाव बसस्थानकासमोर विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनकर्त्यांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
केज ते कळंब महामार्गावर विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. सदरील आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बाबासाहेब रंगनाथ बांगर (पोलीस हवालदार) यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मण ओव्हाळ, गोविंद उबाळे, आनंत शिनगारे, नितीन मस्के, निखील मस्के यांच्यासह दहा ते पंधरा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.












