वडवणी, गेवराईचा, आठवडी बाजार बंद राहणार
सराटी अंतरवलीत जरांगेंचे उपोषण सुरू; चौथ्या दिवशी प्रकृती खालावली
पाटील पाणी तरी घ्या म्हणत मराठ्यांचा अंतरवलीत ठिय्या
बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून): राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाीं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तिसर्या टप्प्यातले उपोषण आंदोलन सुरू केले असून आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मराां समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सकळ मराठा समाजाच्या वतीने उभ्या महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे बीड जिल्हा कडकडीत बंद राहणार आहे. गेवराईत उद्याचा बाजार बंद ठेवण्यात येणार असून वडवणीतला आठवडी बाजारही बंद ठेवण्यात येणार आहे. बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, धारूरसह ग्रामीण भागातही मराठा समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आल्याचे सांगण्यात येते. ही बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे. दुसरीकडे मनोज जरांगेंची प्रकृती पाहता मराठा समाजाने सराटी अंतरवलीत पाटील पाणी तरी घ्या म्हणत ठिय्या सुरू ठेवला आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसांठी गेल्या काही दिवसांपूर्वी मराठ्यांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर जावून धडकला. त्यावेळी एक अधिसूचना काढण्यात आली आणि त्या अधिसूचनेची अंमलबजावणी आठवडा-पंधरा दिवसात केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र राज्य सरकारने आश्वासन पाळलं नसल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. सराटी आंतरवलीत आज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. कुठलेही उपचार त्यांनी अद्याप घेतले नाहीत त्यामुळे जरांगेंची प्रकृती पुर्णत: खालावली आहे. तसे व्हिडिओ सोशल मिडियाद्वारे बाहेर व्हायरल होत असल्याने जरांगेंच्या प्रकृतीवरून मराठ्यात संताप व्यक्त केला जात आहे. त्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बीड जिचल्ह्यासह मराठवाड्यातील सर्व ग्रामीण भागात बंदची हाक देण्यात आली आहे. गेवराई, वडवणी येथील आठवडी बाजार बंद राहणार आहेत. दुसरीकडे पाटील पाणी तरी घ्या म्हणत मराठ्यांचा अंतरवलीत ठिय्या आजपासून सुरू झाला आहे.












