किल्ले धारूर (रिपोर्टर): धारूर शहर व तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने सगळे सोयरे या आदेशाच्या अंमलबजावणी करण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशावरून शहर व तालुक्यामध्ये सर्वत्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळी धारूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले तर तालुक्यातील अंजनडोह ,कारी, चोरंबा ,आरणवाडी तेलगाव शहरांमध्येही शासनाने मराठा समाजाची फसवणूक केली आहे याच्या निषेधार्थ व सगेसोयरे याची अंमलबजावणी करण्याच्या समरणार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले . यावेळी आंदोलन व पोलीस यांच्यामध्ये काही प्रमाणात शाब्दिक चकमकही झाली परंतु शांतता कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सकल मराठा समाजाने रस्ता रोको आंदोलन केले आहे याप्रसंगी पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.












