वडवणी (रिपोर्टर):- मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने आज सकाळी 11 वा.वडवणीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
याबाबत आधिक माहिती अशी कि, ज्या मराठा समाजाच्या कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांच्या सगेसोयरे यांना देखील कुणबीचे जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे तसेच सरकारने याबाबतचा काढलेला अध्यादेशाची तात्काळ अंमलबाजावणी करावी यामागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने आज वडवणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी जवळपास अर्धा तास भव्य असा रस्तारोको करण्यात आला असून एक मराठा लाख मराठा … हम सब जरांगे पाटील, आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच यासह अन्य घोषणा देण्यात आल्या होत्या. या रस्तारोको दरम्यान काही काळ वाहने टप्प झाली होती. या आंदोलनात राजकिय आणि समाजिक नेत्यासोबतच सकल मराठा समाज उपस्थित होते. सदरील मागण्याचे निवेदन वडवणी पोलीस स्टेशनचे ठाणे प्रमुख अमन सिरसट यांना देण्यात आले आहे.